अल्पसंख्यक हक्क दिनी शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी उपाय योजना करा

जाहिरात-2
जि प सदस्या नफिसा परकार यांची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे  मागणी
खेड । प्रतिनिधी
दरवर्षी १८ डिसेंबर हा अल्पसंख्यक हक्क दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात असतो मात्र  अल्पसंख्यक नागरिकांना राज्य सरकारच्या अनेक योजनाची माहिती नसल्याने या दिनी या नागरिकांसाठी शासकीय पातळीवर योजनांची माहिती मिळण्याकरीता उपाय योजना करण्याची मागणी जिप सदस्या नफिसा परकार यांनी  जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदना द्वारे केली आहे.
या दिनाचे औचित्य साधून  सर्व प्रांत कार्यालय तहसिलदार,कार्याल व ग्रामपंचायत कार्यालयात हा दिन साजरा करण्याचे आदेश देऊन  राज्य सरकार च्या कल्याणकारी योजना ग्रामस्थांना माहीत होण्या करिता कार्यक्रम किंबहुना उपक्रम राबविण्यात यावा जेणे करून नागरिकाना या योजनांचा लाभ घेता येईल असे निवेदना द्वारे श्रीमती परकार यांनी सूचित केले आहे.
जाहिरात4