खेडमध्ये युद्धकला शिबीरास प्रारंभ

जाहिरात-2
खेड । प्रतिनिधी
खेडमध्ये २० ते २८ नोव्हेंबर याकालावधीत सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत सहजीवन हायस्कूल येथे युद्धकला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात शिवकालीन युद्धकला याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवकालीन युद्धकलेतील सिंगल काठी, डबल काठी, तलवारबाजी, दानपट्टा, पद, युद्धकला, भोवरा या हत्यारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुणे येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक नवनाथ शिबिरार्थना मार्गदर्शन करणार आहेत.  शिबिरात सहभागी होण्यासाठी सुनिल शिंदे (८६२४००१००१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
जाहिरात4