‘रोरो’ च्या त्या अपघाताची २३ रोजी चिपळूण ला हॊणार चौकशी !

जाहिरात-2
१६  रेल्वे कर्मचाऱ्यांना चौकशीला जावे लागणार सामोरे
खेड । प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावरील सुकिवलीनजीक  रो रो सेवे मधून कोसळलेल्या  मालवाहू ट्रक अपघातप्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे चार सदस्यीय समितीमार्फत चौकशी होणार असून या मध्ये १६ रेल्वे कर्मचाऱ्यांना ही चौकशी ला सामोरे जावे लागणार आहे यामध्ये कोलाड, दिवाणखवटी व खेडमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोकण रेल्वे मार्गावर सुकिवलीनजीक धावत्या रोरो तून मालवाहू ट्रक रुळावरून कोसळून अपघात घडला होता. अपघातात ट्रकचालक वसीम शेख सुदैवानं  बचावला तर ट्रकचा पूर्णपणे चुराडा झाला होता. २० वर्षांत प्रथमच घडलेल्या या अपघाताने प्रशासनही हादरले होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त मालवाहू ट्रक बाजूला करण्यात आला. ट्रकमधील साहित्य व्यवस्थित बांधले न गेल्यामुळेच ट्रक जागेवरून हलून कोसळला असावा, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. या सर्व बाबी चौकशी मध्ये समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी अपघात ग्रस्त ट्रक एका क्रेन च्या मदतीने बाहेर काढून सुकीवली येथील मोकळ्या जागेत ठेवण्यात आला आहे तर अपघात ग्रस्त ट्रक मधील पत्रे देखील बाजूला करण्यात आले आहे या झालेल्या अपघातामुळे रेल्वे रुळाला काही धोका आहे की नाही याची चाचपनी देखील गुरुवारी करण्यात आली. त्यामुळे येथील मार्गावरून धावणाऱ्या गाड्या संथ गतीने धावत होत्या.  या अपघाताच्या चौकशीसाठी रेल्वे प्रशासनाने विविध खात्यांतर्गत तातडीने चार सदस्यीय समिती नेमली आहे. चौकशीनंतरच अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे.
जाहिरात4