हिरोचा धमाका : फक्त ३२ दिवसांत ३२ लाख बाईक्स-स्कूटर्सची विक्री

जाहिरात-2

नवी दिल्लीः हिरो मोटोकॉर्पने फेस्टिवल सीजनमध्ये जबरदस्त विक्री केली आहे. कंपनीने कोविड १९ आउटब्रेक असूनही केवळ ३२ दिवसांत १४ लाख हिरो बाईक्स आणि स्कूटर्सची विक्री केली आहे. कंपनीच्या Splendor+ आणि HF Deluxe मॉडल्स 100cc ची खूप मोठी विकी झाली आहे. तर 125cc मध्ये ग्लॅमर आणइ सुपर स्प्लेंडर यासारखे मॉडल्सचेही चांगली विक्री झाली आहे. 160cc सेगमेंट मध्ये Xtreme 160R आणि XPulse बाइकला खूप पसंती मिळाली आहे.

वाचा : Mi, Redmi,Poco या चीनी कंपनीचे स्मार्टफोन्स होत आहेत आहेत क्रॅश

हिरो स्प्लेंडर सर्वात प्रसिद्ध मॉडल
कंपनीने काही वेळे आधी हिरो स्प्लेंडर प्लसचे ब्लॅक एक्सेंट व्हेरियंट आणले होते. हिरो स्प्लेंडर कंपनीची सर्वात प्रसिद्ध बाईक्स पैकी एक आहे. ब्लॅक अँड एक्सेंट व्हेरियंटची किंमत ६४ हजार ४७० रुपये आहे. हिरो स्प्लेंडर कंपनीची सर्वात प्रसिद्ध बाईक्स पैकी एक आहे. याशिवाय, टॉप टू व्हीलर्सच्या यादीत ही बाईक नेहमी टॉपवर असते.

३ व्हेरियंटमध्ये उपलब्ध
ही बाईक ३ व्हेरियंट मध्ये येत आहे. याच्या किक स्टार्ट व्हेरियंटची किंमत आता ६० हजार ५०० रुपये झाली आहे. जी आधी ६० हजार ३५० रुपये होती. या मोटरसायकलच्या सेल्फ स्टार्ट व्हेरियंटची किंमत आता ६२ हजार ८०० रुपये झालीआहे. आधी ६२ हजार ६५० रुपये होती. तर स्प्लेंडर प्लस सेल्फ स्टार्ट i3S व्हेरियंटची किंमत आता ६४ हजार १० रुपये झाली आहे. याआधी या व्हेरियंटची किंमत ६३ हजार ८६० रुपये होती.

वाचा : Mi, Redmi,Poco या चीनी कंपनीचे स्मार्टफोन्स होत आहेत आहेत क्रॅश

Splendor Plus बाइक मध्ये 97.2cc, सिंगल-सिलिंडर, एयर-कूल्ड इंजिन दिले आहे. जे 8,000rpm वर 7.8 bhp चे पॉवर आणि 6,000rpm वर 8.05Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. बाइक मध्ये ट्यूबलेस टायर दिले आहेत. तर 130mm रियर ब्रेक दिले आहेत.

जाहिरात4