सुदैवाने चालक बचावला
खेड | देवेंद्र जाधव
कोकण रेल्वे मार्गावर बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन केरळच्या दिशेनं ट्रक वाहतूक करणाऱ्या रोरो सेवेतील एक ट्रक अचानक रेल्वेवरून रुळा शेजारी उलटून अपघात झाला. ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालकाने उडी टाकल्याने तो सुदैवाने बचावला.या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
रो रो वाहतुकी मधील कोलाड येथून वेरणा येथे पत्रे वाहतूक करणारा ट्रक सुकीवली नजीकच्या वळणावर रो रो या रेल्वे सेवेद्वारे नेला जात असताना रेल्वे मधून कोसळत गेला. यामध्ये चालक वसीम याकूब शेख ( ३४ रा पनवेल ) हा मात्र सुदैवाने बचावला.
दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे मोठा आवाज झाल्याने काही नागरिक घराबाहेर पडले. मात्र अंधार असल्याने त्यांच्या काही दृष्टी पथात आले नाही. मध्यरात्री कोकण रेल्वे प्रशासना कडून मदत कार्य करत कोसळलेला ट्रक बाजूला करून पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वाहतुक पूर्ववत करण्यात आली.
मात्र यामध्ये मुंबईहुन रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या कोकण कन्या व मडगाव एक्स्प्रेस या दोन डाऊन गाड्या वेगवेगळ्या स्थानका वर थांबवून ठेवण्यात आल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
ट्रक मध्ये ओव्हरलोड साहित्य असल्याने ट्रक कोसळला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुमारे २१ टन पेक्षा जास्त साहित्य असल्याचा अंदाज वर्तवला जात असून त्या मुळेच सुकीवली येथील वळणा नजीक ट्रक लोखंडी साखळदंड तुटून तो कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे
सुदैवाने बचावलो ट्रक चालक !
मध्यरात्री झालेल्या अपघातात मी ट्रक मध्ये च झोपलो होतो मात्र अचानक ट्रक च्या साखळदंड तुटले आणि काही क्षणात ट्रक वाहतकू ट्रेन च्या बाहेर जाऊ लागल्याने काही कळायच्या आत मी देखील ट्रक वर उडी घेऊन जीव वाचवण्या चा प्रयत्न केला यामध्ये दैव बलवत्तर म्हणून वाचलो असल्याचे चालक वसीम शेख याने प्रहार डिजिटल शी बोलताना सांगितले