वेंगुर्ल्यात एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

जाहिरात-2

 

नवरपरिषदेचा क्रीडा मधील आणखी एक उपक्रम

वेंगुर्ला | प्रतिनिधी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कॅम्प स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय पंच विक्रम भांगले यांच्या हस्ते फित कापून तर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
वेंगुर्लेत नगरपरिषदेने क्रिडा क्षेत्रात हा आणखीन एक उपक्रम सुरू केला आहे. विक्रम भांगले यांनी वेंगुर्ल्यातील या प्रशिक्षण केंद्रामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. त्यासाठी आपल्याकडील मुलांना लागणारे मार्गदर्शन देण्याची तयारी असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला तालुक्यात सर्व खेळ सुरु करणे हा आपला मुख्य उद्देश राहिला असून या प्रशिक्षणातून पुढीलवर्षी नेमबाजी स्पर्धेत आपल्या तालुक्यातील विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम असतील, असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटनप्रसंगी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, प्रशिक्षण संचालक कांचन उपरकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, विधाता सावंत, श्रेया मयेकर, कृतिका कुबल, साक्षी पेडणेकर, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी प्रास्तविक तर शितल आंगचेकर यांनी आभार मानले.

जाहिरात4