एसएसपीएम इंजिनिअर कॉलेजच्या शिवम पवारची भारतीय हॉलीबॉल संघात निवड

जाहिरात-2

वैभववाडी एडगांवच्या या सुपुत्राचे सर्वत्र होतेय अभिनंदन

वैभववाडी । नरेंद्र कोलते

भुतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील एडगांव गावचा सुपुत्र शिवम जयवंत पवार वय 20 याची भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा 24 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. शुभमच्या निवडीबद्दल जिल्ह्यात अभिनंदन होत आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. शुभम हा एसएसपीएम इंजिनियर कॉलेज कणकवली या ठिकाणी शिकत आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता.

या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत शुभमने अष्टपैलू खेळी केली होती. मिळालेल्या यशात शुभमचे फार मोठे योगदान आहे. सातत्यपूर्ण खेळीमुळे शुभमची आता भारतीय संघात निवड झाली आहे. वर्ड अमँच्यूर स्पोर्ट कौन्सिल भुतान यांच्यामार्फत ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली जाणार आहे.

शुभमचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर करूळ जामदारवाडी, माध्यमिक शिक्षण माधवराव पवार विद्यालय कोकिसरे तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. शुभमला मार्गदर्शन गोविंद भाट गारगोटी, पी. डी. पाटील व श्री. यादव कोकिसरे विद्यालय यांचे लाभले आहे. शुभमचे वडील पोस्टमास्तर तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. शुभमला आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात4