जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

जाहिरात-2

वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या निवडणुकीत जो बायडन यांनी विजय मिळवला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते लवकरच पदभार स्विकारणार आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमवत बाजी मारली आहे.

मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे. सीएनएनने जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीचे वृत्त दिले आहे. जोसेफ रॉबीनेट बायडन अर्थात जो बायडन यांच्या विजयाची खात्री होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. मात्र, आता या निवडणुकीचा निकाल लागला आहे. जो बायडन यांनी २७० चा मॅजिक फिगर पार केला आहे. त्यामुळे, या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याचे दिसून येत असल्याचे सीएनएन, एनबीसी, एबीसी तसेच फॉक्स या वृत्त वाहिन्यांनी म्हटले असून जो बाईडन संभाव्य विजेता म्हणून घोषित केले आहे.

जाहिरात4