आपत्तीत कोलमडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सरकारकडे वेळच नाही

जाहिरात-2
निलेश राणे यांचा घणाघात

रत्नागिरी । प्रतिनिधी

सरकारच्या कारभारावर थेट बोलणाऱ्या पत्रकार अर्णब गोस्वामीविरुद्ध कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाला प्रत्येक सुनावणीला 10 लाख रुपये देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपत्तीमध्ये कोलमडलेल्या शेतकऱ्याच्या हातावर फक्त 3 हजार 700 रुपयांचा चेक ठेवते, जो प्रश्न निर्माणच झाला नसता ते मराठा आरक्षण केवळ सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले, यावरून ठाकरे सरकार नेमके कोणत्या बाबतीत गंभीर आहे हे आता स्पष्ट झाले असून मुख्यमंत्र्यांना भूमीपुत्रांशी कोणतेच देणेघेणे नाही अशी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

परतीच्या पावसाने कोलमडलेल्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी निलेश राणे यांनी बुधवारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना स्वतः आर्थिक मदत सुद्धा केली. तर आज त्यांनी पत्रकार परिषदेत कोकणातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

वादळामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातचे आलेल पिक गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. अशा स्थितीत राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात देवून त्यांना दिलासा देणे गरजेचे होते. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पूसायला मंत्र्यांना वेळ नाही. आमदार, खासदार फिरकले नाहीत. जे मंत्री आले, ते बांधावर गेलेच नाही. अधिकारी पंचनामे करत नाहीत अशी रत्नागिरी जिल्ह्याची अवस्था झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाची मदत अजून दापोली, मंडणगडच्या रहिवाशांना पोहचली नाही. मग आता वादळात सापडलेल्या शेतकर्यांना मदत केव्हा मिळणार ? असा प्रश्न  उपस्थित करत, ज्या कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरुन दिले, त्या शिवसेनेच्या सरकारला कोकणवासियांना मदत करता येत नाही. हेच दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात सुमारे १६०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत तात्काळ पंचनामे करुन शासनाने शेतकर्यांना मदत दिली पाहिजे. मात्र या सरकारची ती मानसिकता नसल्याचे श्री.राणे यांनी सांगितले. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात वकिलांना पैसे देणाऱ्या सरकारची अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना मदत करताना तिजोरी रिकामी कशी होते हा सवाल त्यांनी केला.

आपण उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे हेक्टरी दिड लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावर ना. पवार काय निर्णय घेतात याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. तुटपुंजी मदत असेल तरी आम्हाला नकोच हि आज शेतकर्यांची भूमिका आहे. याचा सरकारने गांभिर्याने विचार करणे आवश्यक असल्याचेही श्री.राणे यांनी सांगितले.

भूमीपुत्रांशी या सरकारचे कोणतेच देणेघेणे नाही म्हणूनच मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मात्र मराठा समाज काय करू शकतो हे मूक मोरचयाने दाखवून दिले आहे च, त्यामुळे सरकारने त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

केवळ राजकारणासाठी सत्तेचा वापर करणाऱ्या सरकारकडून केवळ राणेंना विरोध, त्यांच्याशी स्पर्धा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकिय महाविद्यालयासह अनेक घोषणा केल्या जातात. पण सिंधुदुर्ग पेक्षाही ज्या रत्नागिरीने शिवसेनेसाठी भरभरून दिले त्या रत्नागिरी जिल्हाचा विचार हे सरकार विकासासाठी का करत नाही ? इथे वैद्यकिय महाविद्यालया का जाहीर केले जात नाही, हा प्रश्नच आहे. केवळ राजकारण करण्यात शिवसेनेच्या मंत्र्यांचा वेळ जात आहे. त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे देणेघेणे नाही असेही ते म्हणाले. निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने रायगड पर्यंत येणारे मुख्यमंत्री जवळचया दापोलीत फिरकले नाही, इथे शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी त्यांना देणेघेणे नाही, यावरून रत्नागिरीबाबतीत मुख्यमंत्री किती गंभीर आहेत हेच दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

तिवरे धरणाच्या चौकशीवरही निलेश राणे यांनी वस्तुस्थिती वर बोट ठेवले. दीड वर्ष उलटून गेले तरीही अजून चौकशीतून काहीच निष्पन्न होत नाही, एफ आय आर दाखल होत नाही, उलट आणखी एक नवीन चौकशी समितीस्थापन होते यातूनच कुणाला तरी वाचवलं जातंय असेही तेम्हणले.

रत्नागिरी जिल्हा परिषद दिवळखोरीत आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत. संगमेश्वरचे अध्यक्ष याना केवळ काठपुतली म्हणून पदावर बसविण्यात आले आहे. त्यांना कामकाज जमत नाही अशा गर्तेत रत्नागिरी जिल्हा अडकला आहे. आता जनतेलाच विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे निलेश राणे म्हणाले.

जाहिरात4