रत्नागिरी शहरात टपरी फोडून ३ हजाराचा मुद्देमाल चोरीस

रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरातील आझाद नगर येथील टपरी फोडून अज्ञाताने वजनकाटा,छोटा बॅटरी इन्व्हर्टर आणि रोख रक्कम असा एकूण 3 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.ही घटना शनिवार 10 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते रविवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा.कालावधीत घडली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सत्तार सुल्तान शेख (54,रा.किर्तीनगर मजगाव,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,सत्तार शेख यांची चर्मालय ते रत्नागिरी जाणार्‍या रस्त्यावरील आझादनगर येथे चिकन सेंटरजवळ टपरी आहे.अज्ञाताने ती टपरी फोडून 2 हजार रुपयांचा वजनकाटा,500 रुपयांचा छोटा बॅटरी इन्व्हर्टर आणि बेवारस मुलांच्या मदतीसाठी जमा होणारी 550 रुपयांची रोख रक्कम लांबवली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक वीर करत आहेत.

जाहिरात4