Breaking : दारुबंदी सप्ताहात जिल्ह्यात सापडली ८० हजाराची दारू आणि 11 संशयित

राज्य उत्पादन शुल्क खात्याची 2 ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत कारवाई

रत्नागिरी। प्रतिनिधी
दारुबंदी सप्ताहात 2 ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि चिपळूण या ठिकाणी एकूण 16 छापे टाकण्यात आले.त्यात 11 संशयितांना अटक करण्यात आली असून 80 हजार 780 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक विभागाचे निरीक्षक शरद अंबाजी जाधव,दुय्यम निरीक्षक किरण पाटील,सुनिल सावंत,जवान सागर पवार,निनाद सुर्वेे आणि वाहन चालक विचारे व महिला जवान अनिता नागरमोजे यांनी दारुबंदी गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारु जप्त करत ही कारवाई केली.

जाहिरात4