जंगली श्वापदांसोबतच आता परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला

खंडाळा । वार्ताहर
जयगड, खंडाळा, पन्हळी, सैतवडे, वरवडे, गणपतीपुळे भागात सोमवार दुपारी ३ वाजल्या पासून मेघगर्जना सह जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाऊसाचे पाणीआल्याने शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

एकीकडे जंगली प्राण्यांमुळे शेतकरी आधीपासूनच त्रासलेला आहे. शेत संरक्षणासाठी आवश्यक असलेले शास्त्र परवाने सध्या देणे बंद असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे. या जंगली श्वापदांपासून आपली शेत वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्याचवेळी पुन्हा यंदाही परतीच्या पावसाचा दणका शेतकऱ्यांना बसला असून शेतातील तयार भात पीक कापून शेतातच ठेवले असताना आता ते पावसामध्ये भिजले असून ते खराब होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे रात्री जंगली श्वापदे आणि दिवसभर पाऊस यात भात शेतीचे अतोनात नुकसान होत आहे.

जाहिरात4