वाहतूक पासापेक्षा अधिक वाळू वाहतुक करणा-या डंपर विरोधात दंडात्मक कारवाई

मंडणगड । प्रतिनिधी

मंडणगड महसुल प्रशासनाच्या पथकाने वाहतूक पासापेक्षा अधिक वाळू वाहतूक करणा-या डंपरविरोधात कारवाई करत 1 लाख 14 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. मंडणगड तहसील कार्यालय येथून मिळालेल्या माहितीनुसार महसुलच्या भरारी पथकाला रविवार दि. 27 रोजी पहाटे शहरातील पाट रोड व वाळू वाहतूक करताना डंपर क्रं. एम.एच.08.एच.0808 हा आढळून आला त्याची तपासणी केली असता दोन ब्रासची आंबेत ते मंडणगड वाहतूकीचा पास मिळाला. मात्र उर्वरीत दोन ब्रास वाळू वाहतूकीचा पास नसल्याने त्यावर दोन ब्रास विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी 1 लाख 14 हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती मंडणगडचे तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.

क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूकीवर कारवाई करत मंडणगड तालुक्यात सुरु असलेल्या विनापरवाना वाळु उपसा व वाहतूकीचे विरोधात कारवाई करण्यास येथील महसुल विभागास अखेर मुहूर्त सापडला आहे. चिपळूण तालुक्यात तेथील महसुल विभागाने म्हाप्रळ येथून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केल्यानंतर मंडणगधील वाळु उपशावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर येथील महसुल विभागास आपली कर्तव्याची जाग आली खरं पण महसुल विभागाने शहरात वाळु वाहतूक विरोधात महसुल विभागाने केलेली कारवाई ही उशीरा सुचलेले शहाणपण व एका अर्थाने वरवरचा इलाज असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

सावित्री नदी म्हाप्रळ परिसरात रायगडमधील वाळु उपसा करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या वाळु उपशासंदर्भातील तक्रारीकडे येथील महसुल विभागाने दोन महिन्यापासून दुर्लक्ष केल्याने सक्शनचे विनापरवाना वाळु उपशास आयतीच चालना मिळाली असल्याने डंपर विरोधातील कारवाई ही वरवरची वाटत आहे तालुक्यातील कुठल्याही रेती गटात कोणत्याही पध्दतीचा वाळु उपसा सुरु नसल्याने वाहतूक करण्यासाठी डंपरमध्ये वाळु आलीच कोठुन त्या ठिकाणाचा आधी शोध घेणे आवश्यक आहे व वाळु उपासा आधी बंद करणे गरजेचे आहे. सप्टेंबर महिन्यात तहसिल कार्यालयाने पुर्वी पकडलेल्या बारा ब्रास वाळुंचे लिलाव विक्री झाली होती व ही प्रक्रीया बारा दिवसांचे कालवधीत पुर्ण करावयाची होती तिचा कालवधी संपलेला आहे. शहरात झालेली करवाईचे अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण झाले असून याची उत्तरे कारवाईसाठी टाळटाळ करणाऱ्या महसुल विभागालाच द्यावी लागणार आहेत.

जाहिरात4