सुवर्णकार व लायन्स क्लबचे संतोष चोडणकर यांच्या पुढाकाराने उभाबाजार मध्ये निर्जंतुकीकरण

जाहिरात-2

सुवर्णकार व लायन्स क्लबचे संतोष चोडणकर यांच्या पुढाकाराने उभाबाजार मध्ये निर्जंतुकीकरण
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडीतील सुवर्णकारानी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आदर्शवत असे काम केले आहे. सर्व सुवर्णकारानी आपल्या पेढ्या व बाजार बंद ठेवुन सावंतवाडीकरांसाठी योगदान दिलेच पण प्रसिध्द सुवर्णकार संतोष चौडणकर यानी उभाबाजार येथे नाॅनब्लिच कोरोना प्रतिबंधक संजु विरनोडकर टिम मार्फत स्वखर्चाने जंतुनाशक फवारणी करुन घेतली.
यात बँक आँफ ईंडीया,वल्लभ नेगगी निवासस्थान,वसंत भिकाजी चौडणकर, प्रसिध्द विष्णु वामन रेडकर घावूक भुसारी दुकार तसेच समाजिक कार्यकर्ते राजु मसुरकर पेढी ,दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर,रघुनाथ मार्केट,वैष्यवाडा पांदन व सर्व सुवर्णकार पेढीवर व वर्दळीच्या ठिकाणी हि फवारणी करण्यात आली. आकाश मराठे व शुभम बिद्रे यानी योगदान केले. शेखर धारगळकर,दाजी धुरी, किरण हळदणकर,रंजन रेडकर,आबा केसकर, पोकळे,कोरगावकर,बाळा मडगावकर व सुवर्ण कारानी या उपक्रमाचे स्वागत केले व संतोष चौडणकर व संजु विरनोडकर टिमचे आभार मानले.