रिफायनरी समर्थक शिवसेना व स्थानिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांची भेट

जाहिरात-2

राजापूर |प्रतिनिधी
भाजपाचे रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला प्रारंभीपासूनच समर्थन आहे. त्यामुळे शासनाकडून या प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी या मागणीसाठी स्थानिक शेतकरी, जमिनमालकांसह काँग्रेस व शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने भाजपा तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.
आंम्ही स्थानिक शेतकरी जागा देण्यास तयार असुन भविष्यातील विकासासाठी हा प्रकल्प झाला पाहिजे अशी मागणी करत भाजपाने शासनावर दबाव वाढवावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
यावर या भागात प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भाजपात यावे मग या प्रकल्पाला कोण विरोधकच या भागात उरणार नाही असे आवाहन या वेळी गुरव यांनी या शिष्टमंडळातील शिवसैनिकांना केले.
भाजपाचा या प्रकल्पाला प्रारंभीपासूनच पाठींबा असुन हा प्रकल्प झालाच पाहिजे अशी आपली भुमिका असल्याचे गुरव यांनी सांगितले. राजकारण बाजुला ठेऊन शिवसेनेने निदान स्थानिक बेरोजगार तरूणांसाठी या प्रकल्पाचे समर्थन करून तो राबविण्याचा निर्णय घेतला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे गुरव यांनी सांगितले. या भागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना जर हा प्रकल्प व्हावा असे वाटत असेल आणि शिवसेना तो करणार नसेल तर त्या सगळयांनी भाजपात यावे, मग कोण प्रकल्प विरोधकच रहाणार नाही आणि शासनाला प्रकल्प राबवावाच लागेल असे आवाहनही यावेळी गुरव यांनी केले.
याप्रसंगी अॅड.यशवंत कावतकर, जुनेद मुल्ला, विद्याधर राणे, सुरेश तावडे, अ. रज्जाक बोरकर, मन्सूर काझी आदींसह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
फोटो १५ आरजेपी २
रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणीसाठी शासनावर दबाव आणावा या मागणीचे निवेदन भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांना देताना विद्या राणे, जुनेद मुल्ला, मन्सूर काझी, अॅड. यशवंत कावतकर आदी.
——————————————–

जाहिरात4