रत्नागिरी शहरातील नाचणे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

नाचणे परिसरात तरुणाने घरासमोरील खोपट्यात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा.सुमारास उघडकीस आली.

अनंत दत्ताराम सुपल (35,रा.सह्याद्रीनगर नाचणे,रत्नागिरी ) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.या बाबत त्याचे वडील दत्ताराम बाळकृष्ण सुपल (66,रा.सह्याद्रीनगर नाचणे,रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांना खबर दिली.त्यानुसार,मंगळवारी सकाळी ते मुलगा अनंत याला उठवण्यासाठी त्याच्या रूमकडे जात होते.त्यावेळी त्यांना अनंत घरासमोरील खोपट्यामधील लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.त्यांनी त्याला हाक मारली परंतु अनंतने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अखेर दत्ताराम सुपल यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने अनंतला खाली उतरवून शहर पोलिसांना याची खबर दिली.पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

जाहिरात4