अविनाश पावसकर यांची भाजपाच्या युवा मोर्चा जिल्हा चिटणीसपदी निवड

जाहिरात-2

रत्नागिरी ।

भाजपाचे रत्नागिरीतील युवा कायकर्ते अविनाश पावसकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा चिटणीस पदी निवड झाली आहे.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी पावसकर यांची या पदावर नियुक्ती केली. भाजपाचे युवा नेते व माजी खासदार निलेश राणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले पावसकर हे राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. रत्नागिरी व परिसरात युवक वर्गासाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी टाकली आहे. भविष्यात पक्षसंघटना वाढीसाठी काम करताना युवकांच्या माध्यमातुन पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले.

जाहिरात4