ड्रग्ज रॅकेट याबाबत माहिती उघड केल्याने मुख्यमंत्री त्रासले-कंगना

जाहिरात-2

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना याच्यातील वाद संपत नसल्याचं दिसते. कंगनाने मुंबई सोडल्यानंतरही तिचे टि्वटरवरून हल्ले सुरूच आहे. मुंबईहून ती आज चंदीगडला गेली. येथून तिनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करीत टि्वट केलं आहे. कंगनाने आदित्य ठाकरे याचं थेट नाव घेऊन निशाणा साधला आहे.

मी चित्रपटक्षेत्रातील गुंडाराज, माफीया आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरण आणि ड्रग्ज रॅकेट याबाबत माहिती उघड केल्याने मुख्यमंत्री त्रासले आहेत. मुख्यमंत्र्याचे चिरंजीव आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात त्यांच्याविषयी मी माहिती उघड केल्याने हे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरलं आहे, असं टि्वट कंगनाने केलं आहे. मुंबई सुरक्षित नसल्याचं म्हणत शिवसेना ही सोनिया सेना झाली असल्याची टिका यापूर्वी कंगनाने केली होती.

ह्द्यावर दगड ठेवून मी मुंबई सोडत आहे. मुंबईला मी पीओके म्हटल्यापासून मला लक्ष्य करण्यात येत आहे. मी दहशतीखाली असल्याने अखेर मी हे शहर सोडून जात असल्याचे अभिनेत्री कंगना राणावत हिने म्हटले आहे. कंगनाने घेतलेल्या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणानंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बोट ठेवत सुशांत हा त्याच व्यवस्थेचा बळी असल्याची टीका केली होती. त्यातच तिने नको ती वादग्रस्त विधाने करून नाराजी स्वत:वर ओढावून घेतली होती.

मुंबईला पीओके म्हटल्यानंतर शिवसेनेने संताप व्यक्त करीत तिला लक्ष्य केले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनावर कडाडून हल्ला केला होता. त्यावेळी ती बॅकफूटवर आली आणि जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणून लागली आणि मुंबईबाबत आभारही व्यक्त करू लागली. मात्र इतक्‍यावर हे प्रकरण थांबले नाही. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याप्रमाणे तिनेही शिवसेनेवर हल्लाबोल सुरू केला होता. तो आजही थांबला नव्हता. त्यातच मुंबई महापालिकेने तिचे अनधिकृत घर पाडले आणि तिला एक महिला म्हणून काहीशी सहानुभूतीही मिळाली. या कारवाईनंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना जाहीर आव्हानही दिले.

इतक्‍यावरच न थांबता तिने राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेऊन आपल्यावर शिवसेना आणि ठाकरे सरकार कसा अन्याय करते याचा पाडाही वाचला. मुंबई सोडण्याची घोषणा करेपर्यंत तिने शिवसेनेला लक्ष्य करणे सुरूच ठेवले होते. काहीवेळापूर्वी मात्र तिने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसे ट्‌विट एएनआयने व्हायरल केले आहे.

या ट्‌विटमध्ये कंगना म्हणते, की मुंबई सोडण्याचा निर्णय मी घेत आहे याचे मला खूप दु:ख होत आहे. तिने आजसकाळी तिचे घर सोडले असून ती हिमाचल प्रदेशमधील आपल्या घरी परतली असल्याचे समजते. मुंबईला पीओकेशी तुलना केल्यानंतर मला शिव्याशाप देण्यात आले. मला लक्ष्य करण्यात आले. माझे घर पाडले त्यामुळे मी प्रचंड तणावाखाली होते.

या सर्व प्रकरणात मला सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. माझ्यावर जे आरोप होत आहेत. सतत जे हल्ले होत आहेत. त्याची मला भिती वाटत असल्याने शेवटी मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मनाला खूप दु:ख होत असल्याचेही तिने म्हटले आहे.

 

जाहिरात4