एक प्रसंग ज्वलंत तेजाचा …

जाहिरात-2

। श्री गुरुदेव दत्त ।।

।। वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

एका ठिकाणी श्री .प.प . वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेण्यास एक महिला ने महाराजांन समोर इच्छा व्यक्त केली त्या वेळेस श्री स्वामी महाराज म्हणले तसे दर्शन घेता येणार नाही , परत परत ती महिला विनवणी करीत होती त्यावर महाराज म्हणाले ठीक आहे उद्या ये आणि सोबत शेरभर ज्वारी घेऊन ये ती हो म्हणाली आणि विचार करू लागली ज्वारी कशा करीता असेल, दुसरे दिवशी ती ज्वारी घेऊन आली आणि महाराज समोर दर्शन करीता उभी राहिली , सर्वांचे दर्शन झाल्यानंतर त्या महिलाला म्हणले आधी पायावर ज्वारी टाक मग दर्शन घे ज्वारी पायावर टाकताच ज्वारी फुटून लाह्यांचा ढीग झाला आणि महाराज म्हणले घे दर्शन आता …..

महिलाने दर्शन न घेताच हाथ जोडले याचे कारण संन्यासाचे दर्शन महिलाला डोके ठेऊन घेता येत नाही .

निळकंठ कुलकर्णी

जाहिरात4