आजचे राशीभविष्य दिनांक 16 सप्टेंबर

जाहिरात-2

चंद्रशेखर तेली

मेष रास
नोकरीत आज कामाचा अतिरिक्त ताण पडेल. आध्यात्मिक चिंतन मननात वेळ जाईल. युवकांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.मोठ्यांकडून मिळालेला सल्ला आज उपयोगी पडेल. दुपारपर्यंत मन खिन्न राहील.

वृषभ रास
व्यवसायात यश मिळेल .मानसिक चिंता व चंचलता राहील. महत्वाची कामे दुपारपूर्वी करुन घ्या. जीवनसाथीच्या मताचा आदर करा. स्वभावातील हट्टामुळे आज लोक तुमच्यापासून लांब राहू शकतात. मुलांकडून चांगली बातमी कळेल .

मिथुन रास
तुमचा आत्मविश्वास आज प्रबळ राहील. यात्रा फायदेशीर होईल. आर्थिक उन्नती होईल. आहाराची मात्र काळजी घ्या. तुम्ही कामाच्या ठिकाणी संघभावना दाखवालं. त्यामुळे तुमची प्रशंसा होईल. कौटुंबिक सौख्य बरे राहील.

कर्क रास
आज तुम्हाला नर्वस होण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. काही लोक तुमची टीका करू शकतात. त्याकडे डोळेझाक करा. नकारात्मंक विचार करणाऱ्या लोकांपासून आज चार हात दूर राहा. आर्थ प्राप्तीचा योग आहे.

सिंह रास
उच्च शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. मनोबल कायम उंच राहील असे बघा. आजपर्यत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आज रणनीती आखा. प्रेमिकांनी आपला राग आवरण्याचा प्रयत्न करावा.

कन्या रास
कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडून खोटे बोलले जाणार नाही याची काळजी घ्या, बँकिंग व्यवहार लांबणीवर पडतील. दिवसाच्या पूर्वार्धात तुमचे मन प्रसन्न राहील . घरी आनंदाचे वातावरण राहील. पैसा हातात येईल.

तुळ रास
आजचा दिवस आपल्यासाठी शुभदायी ठरणार आहे, सगळी कामे वेळेत पूर्ण होतील. आत्मविश्वासपूर्ण वागाल. जोडीदार खरेदीची गळ घालील. मित्रांच्या कामात मदत कराल, आरोग्य चांगले राहील .

वृश्चिक रास
मोठी गुंतवणूक करण्याआधी पूर्ण विचार करा किंवा सल्ला घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीनुसार वागावे लागेल. काही जणांना नोकरीसाठी मुलाखतीला जायचा योग आहे. त्याचा परिणाम चांगला येईल.

धनु रास
स्वतःवर भरवसा ठेवा. कार्यक्षेत्रात ओळखी वाढल्याने व्यावसायिक फायदा होईल. घरातील सदस्याबरोबर देवदर्शनाला जायचा योग येईल. दुपारनंतर कदाचित मानहानीचा प्रसंग येईल.कुणाशी कटुता येणार नाही याची काळजी घ्या.

मकर रास
आज जुन्या कर्जामुळे त्रास होईल. काही लोक तुम्हाला किंमत देणार नाहीत .पण त्यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. दिवस शांततेने घालवा. कौटुंबिक सुख चांगले राहील.

कुंभ रास
आज तुमची असलेल्या समस्येपासून सुटका होईल. दान धर्म करण्याकडे कल राहील. जोडीदाराशी चर्चा करून घरातील महत्वाचा प्रश्न सोडवाल. कामाच्या ठिकाणी कारस्थाने करणाऱ्या लोकांशी संबंध येईल. प्रेमीजनांना विरह सहन करावा लागेल.

मीन रास
आज तुम्ही रोम्यांटिक मूड मध्ये असाल . दिवस मजेत जाईल. घरातील चैनीच्या वस्तू खरेदी कराल. सरकारी कामे करण्याचे ठरवलात तर यश मिळेल. आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग सापडतील. ऑनलाईन व्यावसायिकांना लाभदायी दिवस आहे.

जाहिरात4