संगमेश्वरात १३ जणांना झाली कोरोनाची बाधा

जाहिरात-2

देवरूख (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यात
कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक
वाढ होत असल्याचे चित्र आहे.
मंगळवारी आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या
अहवालानुसार तालुक्यातील १३ जणांना
कोरोनाची लागण झाली आहे. ही
माहिती पंचायत समिती आरोग्य विभागाचे
विस्तार अधिकारी संजय जाधव यांनी दिली
आहे.

कोरोना सदृष्य लक्षणे असणाºया तसेच
कोरोना बाधितांच्या संपर्कातील
व्यक्तींचे आरोग्य विभागाकडून स्वॅब
नमुने घेण्यात येतात. सोमवारी लक्षणे व
संपर्कात असलेल्या ६० हून अधिक
व्यक्तींचे स्वॅब नमुने घेवून ते
तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे
पाठविण्यात आले होते. याचा अहवाल
मंगळवारी प्राप्त झाला असून यातील १३ जणांना
कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले
आहे.
बाधित रूग्णांमध्ये ७ महिला व ६ पुरूष
रूग्णांचा समावेश आहे. हे रूग्ण
देवरूख, वांद्री, कांजिवरा, मुचरी
परिसरातील आहेत. १३ नवीन रूग्ण
मिळाल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या
४८९ इतकी झाली आहे. तसेच मंगळवारी
सकाळी २५ जणांची अँन्टीजन टेस्ट
करण्यात आली. यामध्ये १२ पत्रकारांचा
देखील समावेश होता. सर्वांचे
रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे श्री. जाधव
यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात4