माजी जि. प.अध्यक्ष भाजपा पदाधिकारी सुदन बांदिवडेकर यांचे कोरोनाने निधन ; राजकीय वर्तुळात दुखवटा

जाहिरात-2

कणकवली | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा चे जिल्हा सरचिटणीस सुदन बांदिवडेकर (वय 49) यांचे कोरोनामुळे निधन झाले.त्यांचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.सुदन बांदिवडेकर यांच्या निधनाची वार्ता समजताच फोंडाघाट गावावर शोककळा पसरली.तर राजकीय वर्तुळात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.मनमिळावू स्वभावाचा हाडाचा कार्यकर्ता असलेले बांदिवडेकर हे राणे कुटूंबियांचे कट्टर कार्यकर्ते होते.

जाहिरात4