पावशी मिटक्याची वाडी येथील घराला लागलेल्या आगीत घर जळुन खाक

जाहिरात-2

कुडाळ प्रतिनिधी:- पावशी मिटक्याची वाडी येथील हेमंत पंडित यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांचे संपुर्ण घर जळुन खाक झाले असुन पंडीत कुटुंबियांचा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मिटक्याची वाडी येथील हेमंत पंडीत यांचे घर असुन पाच जण या घरात राहतात. मंगळवारी पंडीत कुटुंबिय घर बंद करून घरातली सर्व माणसे नातेवाईकांकडे गेली होती.

दरम्यान मंगळवारी दुपारी त्यांच्या घरातुन मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडताना तेथील काही नागरीकानां दिसुन आले. सदरच्या घराला आग लागलल्याचे लक्षात आले. सदरची घटना कळताच घटनास्थळी तात्काळ पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दिपक आंगणे, राजू शेटये, ग्रामसेवक सरिता धामापूरकर, तलाठी आदी उपस्थित झाले.
तर काही वेळातच कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल ही आले. अथक प्रयत्नाने अग्नीशमन दलाने ही आग विझवली. मात्र तो पर्यंत घरातील वस्तू पुर्णपणे जळुन खाक झाले. त्यामुळे पंडीत कुटुंबियांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
सदरची ही आग एवढी मोठी होती की घराचे पुर्ण छप्पर जळुन खाक झाले. तसेच सोन्याचे दागिने, फॅन तसेच इतर धातूच्या वस्तू पुर्णपणे वितळुन गेल्या, तसेच कपडे, कागद पत्रे, पैसे तसेच इतर वस्तू ही जळुन खाक झाल्या.
या बाबत पंडित यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात घराला आग लागलल्याची खबर दिली आहे. सदरची ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र समजु शकले नाही.

जाहिरात4