रत्नागिरीत माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून प्रशासन करणार कोरोनाचा पाठलाग

जाहिरात-2
जिल्ह्यातील 5 लाख 15 हजार कुटुंबांना भेटणार 686 आरोग्य पथके; आरोग्य विषयक माहिती गोळा करणार

रत्नागिरी । प्रतिनिधी
‘चेस द व्हायरस’ हे ब्रीद घेऊन जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान जिल्ह्यात राबविले जाणार असून यातून घराघरात प्रत्येकाची प्राथमिक चाचणी होणार असून त्यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढेल परंतु त्यांच्यावर उपचार करणे सहज होणार असल्याने संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

ऑनलाईन पत्रकार परिषदेत त्यांनी या अभियानाची माहिती दिली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाकडं, निवासी उपजिल्हाधिकारी दत्त भडकवाड उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले कि १ आरोग्य कर्मचारी आणि १ महिला आणि १ पुरुष स्वयंसेवक अशा तिघांचे मिळून पथक तयार करण्यात आले असून अशी जिल्ह्यात ६८६ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथक दर दिवशी ५० घरांना भेट देऊन तेथील कुटुंब सदस्यांची ऑक्सिजन तपासणी, टॅप आदी तपासणी होणार आहे. ज्यांना लक्षणे आढळून येथील त्यांना फिव्हर सन्तरमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. जिल्ह्यात १६ लाख लोकसंख्या असून ५ लाख १५ हजार ७८२ कुटुंबे आहेत. या अभियानाचे दोन टप्पे असून पहिला 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि दुसरा 14 ते 24 ऑक्टोबर असा राहणार आहे. तसेच मिळणारी माहिती ऑनलाईन भरली जनार असून 15 पथकामागे एका डॉक्टरची नियुक्ती केली जाणार आहे.

या अभियानात काम करणाऱ्या वैयक्तिक आणि गावलाही 50 लाखांपासून बक्षीस देण्यात येणार आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या पथकाला त्रास न देता योग्य माहिती द्यावी असे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संखया वाढणार

या सप्टेंबर अखेर पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा एकदा सुमारे 4 हजर पर्यंत जाण्याची शक्यता असून या अभियानाद्वारे लवकर उपचार करून उद्रेक कमी करण्यात यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली तरीही त्यांच्यावर उपचारासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम असून पुरेशा ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

जाहिरात4