माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रत्नागिरी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर होणार कारवाई

जाहिरात-2
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सीईओनी दिले आश्वासन

रत्नागिरी। प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्ह्यांच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. मात्र त्याची योग्य माहिती देऊन आवश्यक तिथे कोरोना बाधित क्षेत्र घोषित करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्याची असताना स्वतःच्या कामामध्ये टाळाटाळ करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमुळे मोठा गोंधळ निर्माण होत होता. मात्र याची दखल स्वतः जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह सीईओ नि घेतली असून तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

जिल्ह्याच्या तुलनेने रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. शहरामध्ये दोन रहिवाशी इमारतीमागे एक रुग्ण किंवा कुटुंब बाधित आढळून येतेच. त्यातच रुग्ण मोठ्या संख्येने सापडत असल्याने क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याऐवजी आता संबंधित इमारत किंवा वाडी कंटेनमेंट झोन म्हणून केली जाते. त्याचवेळी एखाद्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्याचे नाव जाहीर करणे अपेक्षिaत नसले तरीही तो रुग्ण राहत असलेला परिसर किंवा त्याचा पत्ता घोषित करणे आवश्यक असते. त्यामुळे अन्य नागरिक किंवा परिसरातील रहिवाशी स्वतःची काळजी घेणे किंवा लक्षणे दिसल्यास चाचणी करणे आदी खबरदारी घेऊ शकतात. सध्या शासनानेच आपली खबरदारी आपणच घेण्याची जाबाबदारी प्रत्येकावर टाकली असल्याने हि या संबंधीची योग्य माहिती जनतेला मिळणे आवश्यकच आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे यांच्याकडून हि माहिती गेले अनेक दिवस दिली जात नव्हती. या बाबत ‘प्रहार’ च्या प्रतिनिधीने संपर्क केला असता अशी माहिती मला देण्यास वेळ नाही असे सांगून टाळाटाळ केली होती. त्याचवेळी ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्या परिसराचीही माहिती खूप उशिराने उपलब्ध होत होती. एखादा रुग्ण बाधित झाल्यानंतर तो उपचार घेऊन बरा होऊन घरी परतेपर्यंतही त्या संबंधित परिसराला याची माहिती मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे येत होती. अशा अनेक तक्रारी सुद्धा पुढे येत होत्या.

हि वस्तुस्थिती ऑनलाईन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांच्यासमोर मांडण्यात आली. या गंभीर गोष्टीची दाखल स्वतः जिल्हाधिकारी यांनी घेतलीच परंतु तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी आल्याचे स्वतः श्रीमती जाखड यांनी मान्य केले. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनीही डॉ. गावडे यांच्या कामाबद्दल तक्रार केल्याचे, डॉ. गावडे माहिती देत नसून कामात टाळाटाळ करत असल्याचेही स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्य केलेच परंतु डॉ. गावडे याना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना समज देण्यात येईल आणि योग्य माहिती लोकांपर्यंत जाईल असेही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जाहिरात4