रत्नागिरीत कोरोनाने घेतला पोलिसाचा पहिला बळी

जाहिरात-2

पीएसआय पाचेरीकर यांचे निधन

रत्नागिरी । प्रतिनिधी

रत्नागिरीमध्ये बिनतारी संदेश विभागात काम करणाऱ्या पीएसआय पाचेरीकर यांचा शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे पोलीस विभागातील हा पहिला बळी गेला असून खळबळ उडाली आहे. पोलीस विभागाकडून सोशल मीडियावर ही माहिती देण्यात आली.

गेले 6 महिने रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती वर नियंत्रण मिळवण्यासाठी सदैव झटणाऱ्या रत्नागिरी पोलिसांमध्ये कोरोना शिरकाव यापूर्वीच झाला होता. स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हेही कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर स्वतः डॉ मुंढे यांनी पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर सुद्धा सुरू केले होते.

तरीही रत्नागिरीत कोरोनाचे पोलीस विभागात पहिला बळी घेतला आहे.

रत्नागिरी पोलिसांच्या वायरलेस विभागात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी पीएसआय पाचेरीकर यांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

जाहिरात4