डोळ्यांच्या समस्यांवर सर्व उपचार एकाच ठिकाणी देणारे ‘इन्फिगो’ रत्नागिरीत सुरु

जाहिरात-2

रत्नागिरी | 
मुंबईतील इन्फिगो आय केअर या नेत्रविषयक रुग्णालयांची साखळी निर्माण करणाऱ्या संस्थेने डोळ्यांच्या विविध व गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने निदान , उपचार व शस्त्रक्रिया करून देणारे सुसज्ज हॉस्पिटल दिनांक १ सप्टेंबर २०२० पासून साळवी स्टॉप रत्नागिरी येथे सुरु केले आहे .

इन्फिगो आय केअर या संस्थेची मुंबईमध्ये वाशी , दादर , माहीम , बोरीवली , भाईंदर , विरार , पालघर , बोईसर येथे सुसज्ज अशी डोळ्यांची हॉस्पिटल्स कार्यरत आहेत . गेल्या एक वर्षात या हॉस्पिटलमध्ये एक लाखांहून अधिक रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ञ अनुभवी डॉक्टर्स यांच्या माध्यमातून डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यात आले आहेत .

डोळ्यांच्या आजारांविषयी सांगायचे झाले तर भारतामध्ये मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व , मधुमेहाचा डोळ्यावर होणारा परिणाम , कम्प्युटर किंवा मोबाईल फोनच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांचे उद्भवणारे आजार , अधिक वेळ एअर कंडीशन वातावरणात बसल्याने उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्या , काचबिंदू किंवा ग्लुकोमा या सारखा डोळ्यांचा दृष्टीनाश करणारा आजार या प्रमुख समस्या आहेत . डोळ्यांचे अनेक विभाग असून प्रत्येक व्याधीवर उपचार करणारे प्रशिक्षित तज्ञ असतात याची फार कमी सर्वसामान्यांना माहिती असते . डोळ्यांच्या विविध आजारांचे भारतातील प्रख्यात संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेले तज्ञ डॉक्टर्स इन्फिगोमध्ये रत्नागिरीत उपलब्ध असणार आहेत . या हॉस्पिटलमध्ये जर्मनी व अमेरिका येथून आणलेली अत्याधुनिक निदान यंत्रणा उपलब्ध आहे .

संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेटिना किंवा डोळ्याचा पडदा यावर उपचार करणारे पूर्णवेळ डॉक्टर जवळजवळ उपलब्ध नाहीत . साधारणतः दहा ते बारा टक्के इतक्या व्यक्तींना डायबेटीस असतो असे आढळून आले आहे व रक्तातील साखरेचा डोळ्यांवर व त्याच्या पडद्यावर होणारा परिणाम वाईट स्वरूपाचा असतो त्यामुळे काहीवेळेस अंधत्वही येऊ शकते . म्हणून प्रत्येक मधुमेह व्यक्तींनी वर्षातून किमान एकटा तज्ञ अशा रेटिना डॉक्टर कडून डोळ्याचा पडदा तपासणे आवश्यक ठरते.

इन्फिगोमध्ये डॉ. प्रसाद कामत हे शंकर नेत्रालय चेन्नई येथे उच्च शिक्षण घेतलेले रेटिना सर्जन रुग्णांवर उपचार करणार आहेत. डॉ. कामत यांनी रेटिना किंवा डोळ्याच्या पडद्याच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने केल्या असून त्यांचा रुग्णपरिवार सुरत , मुंबई , रांची , पटना , इंदौर , नागपूर , पुणे अशा अनेक ठिकाणी पसरला आहे. डॉ. प्रसाद कामत इन्फिगों आय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याने रत्नागिरी जिल्हयातील जनतेला रेटिना विषयक तज्ञ सल्ला व उपचार स्थानिकरित्या उपलब्ध होतील, येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी जर्मनीमध्ये बनवलेला मायक्रोस्कोप व VR मशिन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरमध्ये बसवण्यात आले आहे.

लहान मुलांतील डोळ्यांतील तिरळेपणा , लेझी आईज किंवा इतर दृष्टीदोषांचे वेळीच निदान व उपचार झाले तर त्यांच्या मधील व्यंग दूर होऊ शकते. इन्फिगो आय केअरमध्ये डॉ . प्रदीप देशपांडे हे ख्यातनाम तज्ञ डॉक्टर लहान मुलांच्या दृष्टीदोष व दृष्टीव्यंगावर उपचार व विविध अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ओळखले जातात . मोतिबिंदू शस्त्रक्रिया ही सध्या उच्च तंत्रज्ञानामुळे अधिक सोपी व सुलभ झाली असून इन्फिगोमध्ये ए – स्कॅन , बी – स्कॅन , लेन्स मास्टर , याग लेझर व अर्टली मशिन यांनी मोतिबिंदू विभाग सुसज्ज असून डॉ . किरण हिरजे , डॉ . स्वप्ना गंधे , डॉ . नितीन तिवारी हे उच्चप्रशिक्षित तज्ञ भूल न देता बिनटाक्याची मोतिबिंदूवरील मायक्रोफेकोनीट ही शस्त्रक्रिया करतात . या शस्त्रक्रियेनंतर पंधरा मिनिटात रुग्णाला घरी जाता येते .

काचबिंदू किंवा ग्लुकोमा यांवर निदान व उपचार करणारे तंत्रज्ञान म्हणजेच फिल्ड अॅनालिसीस मशिन येथे उपलब्ध आहे . इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ही एका विशिष्ट ध्येयाने नेत्रसेवा देणारी संस्था असून रुग्णांना सर्वोत्तम सल्ला व उपचार रास्त दरामध्ये मिळावेत व तज डॉक्टर्सची सेवा गावं अथवा जिल्हा पातळीपर्यंत पोहोचावी हे उद्दिष्ट ठेवून रत्नागिरी शहरात आली आहे . डोळ्यांच्या सर्वच आजारांवर संबंधित उपचार व संपूर्ण उपचार यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध व्हावी व त्यांना कोणत्याही कारणासाठी मुंबईला जाण्याची गरज पडू नये आणि लोकांचे पैसे व वेळ वाचवा हा मुख्य उद्देश यामागे आहे . डोळ्यांच्या संबंधित या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे रत्नागिरी शहराला एक नवीन ओळख मिळेल व येथील नागरिकांचा वेळ , प्रवास , मानसिक त्रास व पैसे वाचतील आणि योग्यवेळी उपचार उपलब्ध झाल्याने दृष्टीचे पुढील नुकसान टळेल असे इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . श्रीधर ठाकूर यांनी सांगितले .

जाहिरात4