देवरुख येथे खुल्या लेख स्पर्धेचे आयोजन

जाहिरात-2

देवरूख | प्रतिनिधी

शहरातील प्रसिध्द श्री सदगुरू लोकमान्य वाचनालयाच्या वतीने माजी ग्रंथपाल स्वर्गिय ल. वा. साने गुरूजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुली लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष आहे. लेख स्पर्धेसाठी ‘माझ्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत’ असा विषय ठेवण्यात आला आहे. शब्द मर्यादा किमान १२०० व कमाल १५०० शब्दांची आहे. विषय, मांडणी, भाषा शैली, शुध्द लेखन, सर्वसामान्य प्रभाव याचा विचार करून स्पर्धकांना गुण दिले जाणार आहेत. लेख कागदाच्या एका बाजुला पुरेसा समास सोडून सुवाच्च अक्षरात लिहिणे गरजेचे आहे. लेखासोबत स्वतंत्र्य कागदावर संपुर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहवा. लेखावर कोठेही आपले नाव व ओळख लिहू नये.
इच्छुकांनी लेख ३० सप्टेंबर रोजीपर्यंत वाचनालयात ग्रंथपालांकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. किं वा कुरिअर पोस्टाने पाठवावे. स्पर्धेचा निकाल ३१ ऑक्टोबर दरम्यान जाहीर केला जाणार आहे. प्रथम तीन क्रमांकांना ग्रंथ भेट व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उत्तेजनार्थांची निवड केली जाणार असून सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी गजानन जोशी .९४२३२९७३५८ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सदगुरू लोकमान्य वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात4