मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने संगमेश्वर खाडीपट्टा विभागाला झोडपले; १ लाख १६ हजार ६१५ रूपयांचे हानी

जाहिरात-2

 

देवरूख .प्रतिनिधी): आठ दिवसांपुर्वी मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्टा विभागाला झोडपून काढले. नुक सानीच्या पंचनाम्याची मोहिम महसुल यंत्रणेमार्फत पुर्णत्वास नेण्यात आली आहे. या वादळी वाऱ्यामुळे ग्रामस्थांचे १ लाख १६ हजार ६१५ रूपयांचे हानी झाल्याची नोंद तहसील दप्तरी करण्यात आली आहे.
अचानक हजेरी लावलेल्या वादळी वाऱ्यामुळे खाडीपट्टा विभागातील ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. कोंड्ये, मांजरे, डावखोल परिसरात वाऱ्याने जणू धुमाकुळ घातला. घरांवरील छप्परे उडण्याबरोबरच झाड्यांची फांद्या घर व गोठ्यांवर पडणे, झाडे उन्मळून पडणे असा भयावह प्रकार घडला होता. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने विद्युत वाहिन्या तुटण्याबरोबरच खांब जमिनदोस्त होण्याचा प्रकार घडला होता.
तलाठी वर्गाने या नुकसानीचा पंचनामा केला आहे. कोंड्ये येथील दिपक शिंदे यांच्या घराचे ६ हजार ४५० रूपये, सुशिला तांदळे ५ हजार ६०० रूपये, बाळकृष्ण सागवेकर ५ हजार ६०० रूपये, अनंत बोमे ८ हजार ५७५ रूपये, चंद्रकांत साळवी ८ हजार १६० रूपये, आत्माराम बोमे ९ हजार ८०० रूपये, अशोक बोमे ७ हजार ९२० रूपये, सुरेश बोमे ३६ हजार ९४० रूपये, विष्णु देसाई यांच्या घराचे २ हजार २७० रूपये नुकसान झाले आहे.
डावखोल येथील श्रीकृष्ण रहाटे ५ हजार ४०० रूपये, दिलीप रहाटे १ हजार ५०० रूपये, विठ्ठल रहाटे ३ हजार ७०० रूपये तसेच मांजरे येथील विजय देसाई यांचे १४ हजार ७०० रूपये नुकसान झाल्याची नोंद तहसील दप्तरी करण्यात आली आहे. नुकसान ग्रस्तांना शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

 

जाहिरात4