कृषी विद्यापीठ वाहन-चालक संघटनेकडून वृक्ष वाटप

जाहिरात-2

दापोली । प्रतिनिधी

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वाहन चालक आणि ट्रॅक्टर चालकांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी “अंजर्ले” गावातील शेतकरी यांच्यासाठी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दि. ८ सप्टेंबर जी सकाळी ११ वाजता प्रशासकीय कार्यलय विद्यापीठाच्या श्री.स्वामीनाथन हाॅल दापोली येथे आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाला विद्यापीठचे कुलगुरू डाॅ.संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डाॅ.संजय भावे, डाॅ. सतिश नारखेडे ,कुलसचिव,डाॅ प्रमोद सावंत,विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी , नियंत्रक चंद्रकांत चोगले उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत संघटनेचे अध्यक्ष राकेश विचारे यांनी गुलाबाचे रोपं भेट देऊन स्वागत केले.तसेच शेतकरी मित्र राजेश जैन, आणि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर, विस्तार विभागाचे डाॅ.प्रवीण झगडे यांचे स्वागत संघटनेचे उपध्याक्ष मिलींद बालगुडे यांनी गुलाबाचे रोपं भेट देऊन केले. तसेच विद्यापीठातील सर्व संघटनेचे अध्यक्ष, शेतकरी बंधू-भगिनी आणि मध्यवर्ती कार्यशाळेचे अधिक्षक , माजी वाहन चालक, फोटोग्राफर यांचे स्वागत श्री.बालगुडे श्री.पवार यांनी केले.

कार्यक्रमला सर्व मान्यवरांनी व शेतकरी मित्र यांनी उपस्थित शेतकरी बंधु-भगिनींना वाहन चालक संघटनेला शुभेच्छा दिल्या. वाहन चालक संघटनेचे सेक्रेटरी संजय पवार यांनी ” एक मेकास साहाय्य करू अवघे धरूसुपंथ “असा संदेश दिला.

जाहिरात4