खेड तालुका १ हजार कोरोना बाधित रुग्ण संख्ये समीप, बस स्थानकातही शिरकाव 

जाहिरात-2
खेड(प्रतिनिधी)
तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस
वाढ होत झाली आहे गणेशोत्सवानंतर कोरोना बाधितांचा वेग दुपटीने वाढला असल्याने तालुका १ हजार कोरोना बाधीत रुग्ण संख्येच्या समीप येऊन ठेपला असून प्राप्त अहवालात १२ रुग्ण आढळून आल्याने ९९६ वर रुग्ण संख्या पोहचली आहे
तर येथील बस  आगारात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ५
एसटी कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. यात बसस्थानकातील चालक, वाहकांसह वाहतूक नियंत्रक व कार्यशाळा कर्मचार्यांचा समावेश आहे.
शहरातील दोघांसह असगणी २, चिंचषर- वेताळवाडी, फुरूस, तिसंगी, मेटे, कशेडी, पिरलोटे, आवाशी येथीलल प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वँबचे नमुने घेण्यात आले.
जाहिरात4