राजापुरात काँग्रेस आघाडीचा शिवसेनेला थोबीपछाड तर भाजपाची कॉंग्रेस ला साथ

जाहिरात-2
ठोक निधीतील विकास कामांच्या मंजूरीचा प्रस्ताव बहुमताने फेटाळला

राजापूर | प्रतिनिधी
शासनाच्या सुमारे पाच कोटीच्या ठोक निधीतुन शिवसेनेने मंजूर करून आणलेल्या शहरातील विविध प्रकराच्या सुमारे ६९ विकासकामांना बहुमताने नामंजूर करत सत्ताधारी काँग्रेस आघाडीने शिवसेनेला चांगलाच धोपीपछाड दिला आहे. विषय पत्रिकेवरिल या कामे मंजूरी विषयावर झालेल्या मतदानात भाजप नगरसेवकाच्या पाठींब्याने काँग्रेस आघाडीने आठ विरूध्द नऊ मतांनी ही कामे नामंजूर करत बाजी मारली आहे. या निधीतुन शहरातील महत्वपुर्ण रस्ते, पाणीपुरवठा योजना या सार्वजनिक कामांची यादी मंजूर करून ती कामे शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती या बैठकीनंतर नगराध्यक्ष अॅीड. जमिर खलिफे यांनी पत्रकारांना दिली आहे.

राजापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष अॅधड. जमिर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू संकट आणि सोशल डिस्टन्स या नियमांना अनुसरून ही सभा झुम अॅापवर व्हिडिओ कॉन्फरन्स पध्दतीने घेण्यात आली.

या बैठकीत दिव्यांगाना पाच टक्के निधीतुन लाभ देणे यासह घनकचरा व्यवस्थापनात कर्मचारी घेणे, पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजूरी देण्यात आली. शासनाच्या सुमारे पाच कोटी रूपये ठोक निधीतुन शिवसेनेने मंजूर करून आणलेल्या ६९ कामांना देखभाल दुरूस्ती हमीपत्र व नाहरकर दाखला देणे हे महत्वपुर्ण विषय पत्रिकेवरिल विषय चर्चेत आला असता नगराध्यक्ष अॅटड. खलिफे यांनी ही सर्व कामे वैयक्तीक स्वरूपातील असून ती आंम्हाला मान्य नाहीत, ती आंम्ही नामंजूर करत आहोत, या निधीतुन सार्वजनिक हिताची कामे झाली पाहिजेत अशी मागणी करत तसा ठराव मांडला त्याला उपनगराध्यक्ष संजय ओगले यांनी अनुमोदन दिले. त्यावर शिवसेना नगरसेविका सौ. प्रतिक्षा खडपे यांनी उपसूचना माांडली, त्याला विरोधी गटनेते विनय गुरव यांनी अनुमोदन दिले. यावर मतदान घेण्यात आले असता काँग्रेस आघाडीने आठ विरूध्द नऊ मतांनी शिवसेनेचा कामे मंजूरीचा प्रस्ताव फेटाळून शिवसेनेची सर्व कामे खुंटीला लावली आहेत.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडी शासनाने हा निधी दिलेला आहे. मात्र असे असतानाही शिवसेनचे मंत्री, खासदार, आमदार आणि नगर परिषदेतील विरोधी गटनेते हे मनमानी करून शहतील सार्वजनिक हिताची कामे डावलुन आपल्या मर्जीप्रमाणे वैयक्तीक स्वरूपातील कामांना या निधीतुन प्राधान्य दिले आहे. हे आंम्हाला मान्य नसल्याने आंम्ही ही सर्व कामे नामंजूर केल्याचे अॅूड. खलिफे यांनी सांगितले. या निधीतुन आपण शहरातील शिवाजीपथ, कोंढेतड, भटाळीतील सरखोत मार्ग हे मुख्य रस्ते, शिळ जॅकवेलकडील नवीन पर्यायी पाणीपुरवठा वाहिनी टाकणे व अन्य कामे सुचविलेली असून ती यादी या सर्वसाधारण सभेत आंम्ही मंजूर करून शासनाकडे पाठविल्याचे अॅ्ड. खलिफे यांनी सांगितले. एकूणच ठोक निधीतील विकास कामांवरून राजापुरात काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला गेला आहे.

जाहिरात4