कणकवली बँक ऑफ इंडिया बँकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह 

जाहिरात-2

बँक प्रशासनाने शाखा केली बंद ; ग्राहकांची गैरसोय

कणकवली | संतोष राऊळ : 
कणकवली शहरातील बँक ऑफ इंडिया या बँकेतील आउटसोर्सिंग कंपनीतील कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे बँक प्रशासनाने सोमवारी अचानक शाखा बंद ठेवली. त्यामुळे बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे. कणकवली पटवर्धन चौक येथे बॅक ऑफ इंडिया या बँकेची शाखा आहे.सोमवारी अचानक या बँक अधिकाऱ्यांकडून सोमवारी शाखा बंद ठेवण्यात आली. याबाबत अधिक माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियातील आउटसोर्सिंग कंपनीतील एक कर्मचारी रविवारी कोरोना पॉझिटिव आल्याचे समजते. तसेच अन्य एक कर्मचाऱ्यांचे स्वँब घेण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेचे कामकाज ग्राहकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यासंदर्भात बँकेच्या गेटवरच एक निवेदन ग्राहकांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये कोविड१९ संशयित रुग्ण आढळल्यामुळे वरिष्ठ प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत बँकेतील कामकाज बंद राहणार असल्याचे नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. अखेर बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही कोरोना लागण झाल्याची चर्चा कणकवली शहरात होती.

जाहिरात4