अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि श्री टेंबे स्वामी महाराज

जाहिरात-2

।। श्री गुरुदेव दत्त ।।

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज व यतिचक्रवर्ती वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज श्री कस्तुरे यांनी परियात्रा या स्वामी महाराजांच्या चरित्रात एक स्वप्नदृष्ट्रांत सांगितलेला आहे वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या स्वप्नांत एकदा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आले .

त्यांनी जेव्हा दत्तप्रभूंना विचारणा केली की, हे कोण आहेत? तेव्हा दत्तप्रभूंनी उत्तर दिले की , ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असून ते म्हणजेच माझाच दत्तावतार आहेत. हे लक्षात घेऊन तू त्यांच्या दर्शनाला जा. अर्थात दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार यतिचक्रवर्ती वासुदेवानंदसरस्वती स्वामी त्यांच्या दर्शनाला गेले आणि त्यांचं मन प्रसन्न झाले .

श्रीगुरुस्तोत्र

भावें नमूं श्रीगुरुच्या पदासी । जे आपदासी हरि दे पदांसी ।

दासीपरी श्री नमि ज्या पदांसी । यासी भजे तो नमितों पदांसी ।। १।।

सततविनतगम्य श्रेष्ठ दृष्ट। अगम्य । सदयहृदयलभ्य प्रार्थीती ज्यासी सभ्य ।

समद विमद होती यत्प्रसादे न हो ती । कुगति सुगति देती त्या पदा हे विनंती ।। २।।

गुरुपदा विपदापहरा सदा । अभयदा भयदामयदारदा ।

हृतवदान्यमदा तव दास्य दे । अमददा न कुदास्य दे ।। ३ ।।

नमस्ते भवारे नमस्ते शतारे । नमस्तेsरिवैरे प्रशस्तेष्टकत्रे ।

नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे । नमस्तेsरिवैर समस्तेष्टसत्रे ।।४।।

गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी । गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी ।

सतत निवत होतां वारि जें आपदांसी । सतत विनत होऊं आम्ही ही त्या पदांसी ।।५।।

भावे पठति जे लोक हे गुरूस्तोत्रपंचक । तया होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें ।।६।।

।। इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीविरचिंत श्री गुरूस्तोत्रं संपूर्णम् ।।

।। श्रीगुरूचरणार्पणमस्तु ।।

निळकंठ कुलकर्णी
8828615271

जाहिरात4