चिपळूण : पती-पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल

जाहिरात-2

रत्नागिरी | प्रतिनिधी
चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथे पती-पत्नीला अज्ञात कारणातून मारहाण केल्याप्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी रात्री 9वा.सुमारास घडली.

सिध्दार्थ गणपत जाधव आणि शुभम सिध्दार्थ जाधव (दोन्ही रा.कळवंडे,बौध्दवाडी चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सुगंधा सह्याद्री पवार (30,रा.कळवंडे,बौध्दवाडी चिपळूण) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री हे दोघे दारुच्या नशेत कोयती घेउन त्यांच्या पतीला मारण्यासाठी आले होते. या दरम्यान, त्यांचे पती आणि संशयितांच्यात धक्काबुक्की होत असताना पतीला वाचवण्यासाठी त्या मध्ये पडल्या असता सिध्दार्थ जाधवच्या हातातील कोयतीचे टोक सुगंधा पवार यांच्या डोक्याला उजव्या बाजुला लागून त्या जखमी झाल्या.याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस हेड काँस्टेबल मोहिते करत आहेत.

जाहिरात4