Corona Updates : रत्नागिरी जिल्ह्यात सापडले २२२ पॉझिटिव्ह रुग्ण

जाहिरात-2
रत्नागिरी तालुक्यात ९८ तर चिपळूण तालुक्यात मध्ये ६३ रुग्ण

रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे आज जिल्ह्यात २२२पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक नवे ९८ रुग्ण सापडले आहेत तर चिपळूण तालुक्यात मध्ये ६३ रुग्ण तर गुहागरमध्ये २१ रुग्ण मिळाले आहेत दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे
जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ९८५ झाली आहे

दरम्यान सर्व रुग्णालयांमधील ताळमेळ केल्यामुळे जुन्या तारखांचे मृत्यू आजच्या अहवालात वाढवून आले आहेत असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या २४ तासात कोणताही मृत्यू नसला तरी पूर्वीच्या नऊ मृत्यू पावलेल्यांची संख्या अहवालात ॲड झाल्याने आता कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या १६८ झाली आहे

आजच्या अहवालात पॉझिटिव आलेल्या रुग्णांचा तपशील
आरटीपीसीर
गुहागर २
चिपळूण १६
लांजा ५
रत्नागिरी २३
राजापूर १४
एकूण ६०

अँटीजेन
दापोली १
गुहागर १९
राजापूर २
खेड ११
चिपळूण ४७
रत्नागिरी ७५
संगमेश्वर ४
लांजा ३
एकूण १६२

जाहिरात4