परवानगी न घेता जहाजातून जमिनीवर उतरलेल्या परदेशी नागरिक, कॅप्टनसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
जहाजावरील दुखापतग्रस्त परदेशी नागरिक असलेल्या खलाशाला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पोलिस अधिक्षक तसेच परदेशी नोंदणी अधिकार्‍यांची परवानगी न घेतल्याप्रकरणी जहाजाचा कॅप्टन व त्याच्या तीन सहाकार्‍यांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 15 मे ते 16 मे 2020 या कालावधीत जे.एस.डब्ल्यू पोर्ट,जयगड येथे घडली होती.याप्रकरणी शिपींग एजन्सिची पोलिस अधिक्षकांमार्फत चौकशी करुन गुरुवार 10 सप्टेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनिर इस्माईल कर्लेकर (युनिक मरिन एजन्सी,रत्नागिरी),मोहम्मद हसन याझिगी,तारेक हसन याझजी(दोन्ही रा.सिरीयन अरब)आणि मलकित सिंग (रा.डेहराडून,रत्तराखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहे. 15 मे रोजी एम.व्ही मॅजेस्टिक नूर हे जहाज बल्क शूगर घेउन जाण्यासाठी जे.एस.डब्ल्यू पोर्ट. जयगड येथे आले होेते.या जहाजावरील परदेशी नागरिक तारेक याझजी हा जहाजावर काम करत असताना दुखापतग्रस्त झाला होता.त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मुनिर कर्लेकर,जहाजाचा कॅप्टन मोहम्मद याझिगी आणि सेकंड ऑफीसर मलकित सिंग या तिघांनी कोणतीही परवानगी न घेता तारेकला उपचारांसाठी दूपारी 2 वा.जयगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला उर्जा हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथील पोतदार हॉस्पिटल येथे नेउन औषधोपचार पूर्ण झाल्यावर 16 मे ला रात्री 12.30 वा. तारेकला पुन्हा जहाजावर नेण्यात आले होते.त्यामुळे याप्रकरणी शिपींग एजन्सिची पोलिस अधिक्षकांमार्फत चौकशी करुन गुरुवार 10 सप्टेंबर रोजी या चौघांविरोधात फॅारेनर अ‍ॅक्ट 1946 चे कलम 14 प्रमाणे जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात4