सावंतवाडीत मटका दुकानांवर धाडसत्र : पोलिसांची कारवाई

जाहिरात-2

अवैध दारू विक्रीच्या नगराध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांचे पाऊल
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडीतील अवैध दारू विक्रीला आळा बसावा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला होता. अवैध दारू विक्रीला उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आज दुपारी सावंतवाडी शहरातील मटका दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या. यात
महेश सहदेव महाले रा उभाबाजार सावंतवाडी मुदेमाल सह १७५० रूपये,
यशवंत रामकृष्ण पडते रा कोलगाव निरूखे वाडी याच्यावर मुद्देमालासह २३५० रुपये हस्तगत करण्यात आले ही कारवाई गवळी तिठा येथे करण्यात आली. तर संदिप राजाराम आरावेकर याच्याकडून मुद्देमालासह १०३० रुपये हस्तगत करण्यात आले.
सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टी ए सय्यद पोलिस हवालदार प्रसाद कदम महेश जाधव मुकुंद सावंत यांनी ही कारवाई केली.

जाहिरात4