खेड: प्रस्तावित कशेडी घाट बोगद्याचा अर्धा किमी अंतराचा टप्पा पार !

प्रस्तावित कशेडी घाट बोगद्याच्या कामाला अत्याधुनिक ‘बुमर’ चा आधार , अर्धा किमी अंतराचा टप्पा पार! 
 
काम युद्धपातळीवर सुरू ,पुढील वर्षी बोगदा खुला होण्याची शक्यता 
 
देवेंद्र जाधव । खेड
अपघाताच्या दृष्ट्या ‘शापित’ असलेल्या कशेडी घाटात वाढते अपघात यामुळे केंद्र व राज्य शासनानाकडून बहूचर्चित असलेला कशेडी घाट भुयारी मार्ग बनवून अपघाताला पायबंद व वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने या घाटात भुयारी मार्ग करण्याच्या दृष्ट्या टाकण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजना मुळे घाटात सध्या  कातळ फोडण्यासाठी अत्याधुनिक ‘बूमर’ यंत्र  वापरण्यात येत असून घाटात अजस्त्र यंत्रांची ‘धडधड’  सुरू असल्याने आता पर्यंत पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसर्या बाजूचे उत्खनन सुरू असून, आतापर्यंत अर्धा किलोमीटर अंतरावरील टप्पा पूर्ण झाला आहे त्याच बरोबर बोगद्यातील भुयारी मार्गही पूर्णत्वास गेला आहे.
कशेड़ी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बूमर वापरण्यात येत असून, याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहेत. २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची अशा पद्धतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारातील पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र तंत्राचा वापर होतो आहे . हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात वापरले जात आहेत.
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान घाटातील निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र सद्या  खेड तालुक्याच्या बाजूने सुरू झालेल्या बोगद्याचे कामही वेगाने  सुरू असल्याने हे काम २०२१ वर्षाच्या अर्थात  पुढील वर्षाच्या  दृष्टीपथात आहे
कशेडी घाटात रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय  भुयारी मार्ग खणून रस्ता करण्यात येत आहे. घाटात ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फास्ट्रक्चर  कंपनीने घेतले. त्यासाठी ४४१ कोटोंचा
खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील. त्यातील करारानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जांचा पक्का रस्ताही प्रस्तावित आहे. आपत्कालात उपयुक्त असलेले सुविधेचे वायूविजन भुयारही यात समाविष्ट आहे.
पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटर दोन्ही भूयारी मार्गांना जोडणाच्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला आहे . आतील भागात परत यू टर्न घेणाच्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मार्गाने होणार आहे . डोंगरात खेडच्या बाजूने अंतराच्या टप्प्यात हे  काम सुरू करण्यात आले होते.
आतापर्यंत साधारणपणे ७३० मीटर अंतराचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. हा घाट मार्ग आगामी वर्षात पूर्ण झाल्यास कोकण मार्गावरील इंजिनिअरिंग चा एक ‘माईल स्टोन’ ठरणार आहे
जाहिरात4