न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे क्रीडा दिन साजरा

जाहिरात-2

लांजा । प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ट महाविद्यालय लांजामध्ये हाॅकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रशालेचे उप मुख्याध्यापक रमाकांत सावंत यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कऱण्यात आला. यानंतर राष्ट्रीय खेळाडू लिना घाडी, हर्ष माने, रोहित रांबाडे, आर्या मोरे, राजा बेंडखळे, स्वप्निल करंबेळे, संकेत राड्ये, संकेत घाडी यांचा उप मुख्याध्यापक रमाकांत सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी क्रिडा शिक्षक रवींद्र वासुरकर उपस्थित होते.

जाहिरात4