तुरळ येथील दुचाकी टँकर अपघातात युवक जागीच ठार

जाहिरात-2

देवरूख । प्रतिनिधी

मुंबई- गोवा महामार्गावरील तुरळ येथे रविवारी टँकर व मोटारसायकल यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात तुरळ किंजळकरवाडी येथील तरूण जागीच ठार होण्याची दुदैवी घटना घडली आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अरूण रामा किंजळकर (रा. तुरळ किंजळकरवाडी, वय ३४ वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा भीषण अपघात रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुरळ येथील श्री स्वामी समर्थ बैठक हॉल शेजारी घडला. अरूण किंजळकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८, एन-५४८१) घेवून तुरळहून गोळवलीकडे येत होता. तसेच नरेंद्र सिंग (रा. हिमाचलप्रदेश) हा आपल्या ताब्यातील टँकर(एमएच-०४, जीएफ-५७२२) घेवून गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता.

अरूण याचे मोटार सायकलवरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल समोरून येणा-या टँकरवर जावून आदळली. महामार्ग असल्याने वाहनांचा वेगही जास्त होता. ही धडक इतकी भिषण होती की अरूण याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची खबर गोळवली गावचे पोलीस पाटील श्री. पाध्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.

अपघाताची खबर मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, हेड काँन्स्टेबल प्रशांत शिंदे, श्री. झापडेकर, श्री. माने, श्री. देशमवाड, श्री. माणके, श्री. आवाड, श्री. नार्वेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी मोटार सायकल चालक अरूण किंजळकर याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात भा.द. वि. कलम ३०४ अ, २७९, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.

याबाबत अधिक तपास हेड काँन्स्टेबल प्रशांत शिंदे करीत आहेत. अरूण याच्या शवाचे संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकू ल वातावरणात अरूण याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरू णच्या अचानक जाण्याने किंजळकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात4