चिपळुणातील तरुणाचा विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू

जाहिरात-2
रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरातील गोवळकोट देऊळवाडी येथील रहिवाशी असलेल्या संजय गोविंद भैरवकर (४५) या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी बारा वाजता घडला.
 संजय भैरवकर याचे गोवळकोट देऊळवाडी येथे स्वतःचे दुकान आहे. या दुकानातील फ्रिजची साफसफाई करत असताना त्याला विद्युत तारेचा जोरदार झटका बसला. यामुळे तो जागीच बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्याला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे
जाहिरात4