निवळी ग्रामपंचायत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या कॉरंटाइनची करणार ऐसपैस व्यवस्था

जाहिरात-2

कॉरंटाईन कक्षात असणार टी.व्ही सारख्या मनोरंजनात्मक सुविधा

रत्नागिरी :

कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण देशावर कोरोनाच संकट असल्यामुळे शासनाने अटीशर्तींसह साधेपणाने यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यास सांगितले आहे.कोकणातला सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव होय.आपल्या लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी प्रत्येक कोकणवासीय आतुरलेला असतो.कोरोनाचं विघ्न असून सुद्धा या वर्षीदेखील मुंबई, पुणे व इतर शहरांतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत.

शासनाच्या नियमांप्रमाणे ठरलेले दिवस या सर्वांना कॉरंटाईन राहावे लागणार आहे.याची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य, स्वराज प्रतिष्ठान संस्थापक संजय निवळकर यांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायत सदस्य कमिटीच्या एकजुटीने सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील निवळी ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची गावामध्येच तीन कॉरंटाईन कक्षात त्यांना लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेसहित , डिश टी. व्ही आदी मनोरंजनात्मक सुविधा देऊन ऐसपैस व्यवस्था करण्यात येणार आहे.

चाकरमान्यांच्या सेवेसाठी इतरांपेक्षा वेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवत असल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

जाहिरात4