माझ्या नाराजीच्या केवळ अफवाच ! दत्ता सामंत यांचे स्पष्टीकरण

जाहिरात-2

मालवण | कुणाल मांजरेकर
कट्टर राणे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दत्ता सामंत आणि भाजपचे महामंत्री तथा माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामध्ये शनिवारी तासभर चर्चा झाली. या चर्चे दरम्यान श्री. सामंत यांनी आपण नाराज असल्याच्या अफवा असल्याचे स्पष्ट करतानाच सामाजिक आणि धार्मिक स्तरावर वेगळी संकल्पना घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दत्ता सामंत यांच्याबाबत निर्माण होणाऱ्या उलट सुलट अफवाना पूर्णविराम मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे समर्थक असलेले दत्ता सामंत गेले काही महिने राजकीय व्यासपीठापासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री तथा भाजप प्रदेश महामंत्री आम. रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दत्ता सामंत यांची भेट घेतली. सामंत यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाऊ सामंत उपस्थित होते. या भेटीत राजकीय, सामाजिक विविध विषयांवर चर्चा झाली. सामंत यांनीही दिलखुलास संवाद साधला. आपण नाराज असल्याच्या केवळ अफवा आहेत. आपण नाराज नाहीत. माझे सामाजिक कार्य चालूच आहे. यापुढे सामाजिक व धार्मिक स्तरावर एक वेगळी संकल्पना घेऊन समाजकार्य करणार असल्याचा मानस सामंत यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या बाबत उलटसुलट उठणाऱ्या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे.

जाहिरात4