श्रीराम मंदिर भूमिपूजन दिवशी सावंतवाडी हनुमान मंदिरात महाआरती व घंटानाद

जाहिरात-2

सावंतवाडी । समीर कदम
श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामाच्या भव्य मंदिर निर्माणाच्या सुमारे ५०० वर्षे चाललेल्या लढ्याला यश येऊन आता प्रत्येक श्रीरामभक्ताचे स्वप्न असलेल्या श्रीराम मंदिराचे निर्माण पावनभूमी अयोध्या येथे होणार आहे.
श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा मंगलमय सोहळा बुधवार दि. ०५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचे पंतप्रधान सन्मा. श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभहस्ते आणि पूजनीय संतमहंताच्या, प्रमुख निमत्रीतांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्या निमित्त वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत महाआरती आणि घंटानादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रमास सर्व रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी व शक्ती केंद्र प्रमुख धिरेंद्र म्हापसेकर यांनी केले आहे
५०० वर्षे चाललेल्या लढ्याला आलेल्या यशाचे प्रतीक म्हणून प्रत्येक श्रीरामभक्तानी यादिवशी सायंकाळी आपल्या घरासमोर ५ दिवे लावून हा सोहळा साजरा करावा असे आवाहन करण्यात येत आहे वरील सर्व कार्यक्रम कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर पाळुन व सर्व प्रकारची काळजी घेऊन साजरे करावयाचे आहेत.

जाहिरात4