वैभववाडीत अधिकारी, कर्मचारी व व्यापारी बांधवांना भाजपा महिला पदाधिकारी यांनी बांधल्या राख्या

जाहिरात-2

वैभववाडी । नरेंद्र कोलते
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वैभववाडी भाजपा महिला पदाधिकार्‍यांनी शासकीय कार्यालयांना भेट देत अधिकारी व कर्मचारी बांधवांना राख्या बांधल्या. हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. स्नेह आणि उत्सवाचे प्रतिक म्हणून हा सण साजरा केला जातो. येथील पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग व नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच व्यापारी बांधवांना महिला पदाधिकार्‍यांनी ओवाळत राख्या बांधल्या.

यावेळी महिला तालुकाध्यक्ष भारती रावराणे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पं. स. सभापती अक्षता डाफळे, नगराध्यक्षा समिता कुडाळकर, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, शुभांगी पवार, हर्षदा हरयाण, सीमा नानिवडेकर, दीपा गजोबार, सुचित्रा कदम आदी उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले तीन महिने दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा कोव्हीड योद्धा प्रमाणपत्र देऊन भाजपा महिला पदाधिकार्‍यांनी गौरव केला.

जाहिरात4