आडारी रस्त्यावर भगदाड पडलेल्या मुशीमुळे वाहतूक धोकादायक

जाहिरात-2

सभापती अनुश्री कंबळींकडून दखल : काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश

वेंगुर्ले | प्रतिनिधी
उभादांडा आडारी रस्त्यावर असणाऱ्या छोट्या साकव पुलावर (मूस) मोठा खड्डा पडला असून या रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या चारचाकी तसेच अवजड वाहनांना धोका निर्माण झाला आहे, त्यामळे परिसरातील नागरिकांनी या मार्गावरील प्रवेश बंद करण्यात आला आहे. दरम्यान प.स. सभापती सौ. अनुश्री कांबळी यांनी सदर ठिकाणी तात्काळ भेट देत हे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश बांधकाम विभागाच्या दिले आहेत.

आडारी रस्तावर भगदाड पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच येथिल सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा आणि सहकारी यांनी सावधगिरी म्हणून या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना त्याची जाणीव करून देत मोठ्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला. दरम्यान नागरीकांसमवेत सौ. कांबळी यांनी वस्तुस्थितीची पाहणी केली आणि बांधकाम विभागाच्या इंजिनीअर शी संपर्क साधत घटनास्थळी बोलविले. नागरीक आणि बांधकाम विभागाचे इंजिनीअर यांच्या समवेत चर्चा झाल्यानंतर नागरिकांच्या मागणी प्रमाणे सदर मुशीचे काम करण्याबाबत सभापतींनी बांधकाम अधिकाऱ्यांना सुचना दिल्या तसेच सदर ठीकाणी काम करीत असताना येथिल स्थानिक नागरिकांच्या उपस्थित काम करण्यात यावे अथवा स्थानिक नागरिकांना त्याबाबत कल्पना देऊन सदर काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या, यावेळी आडारी येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री विरेंद्र आडारकर, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ मेस्त्री,ज्ञानेश्वर मेस्त्री, कार्मिस आल्मेडा, श्री गुंडू साळगावकर, राधा पेडणेकर, संजय फर्नांडिस, एल्विस आल्मेडा, सँमसन आल्मेडा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात4