कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आरोग्य सुरक्षतेच्या दृष्टीने जनजागृती

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्य सुरक्षतेच्या व जनजागृतीच्या दृष्टिकोनातून covid-19 प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक अशा सूचना व मार्गदर्शन करण्यात आलं. सुरक्षिततेसाठी मोफत मास्क वाटप करण्यात आले.

या प्रसंगी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) अजय मोरे, वरिष्ठ लिपिक श्री. प्रसाद व कामगार उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार केंद्र महिला कल्याण सहाय्यक संस्कृती शिंदे यांनी मानले. त्याचप्रमाणे प्रहार’च्या रत्नागिरी कार्यालय, विजय गॅस एजन्सी जयस्तंभ येथे सुद्धा मोफत मास्क वाटप करण्यात आले.

जाहिरात4