गेल्या २४ तासात १०७ नवे रुग्ण आढळले; ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह ५६९

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
गेल्या २४ तासात प्राप्त अहवालांमध्ये १०७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या १८८१ झाली आहे. दरम्यान ५९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२५२ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय ७, वेळणेश्वर, गुहागर ९, समाजकल्याण १४ , कोव्हीड केअर सेंटर पेढांबे १८, कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल मधील ११ रुग्ण आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी- ३१ रुग्ण
कळबणी – २६ रुग्ण
कामथे- २८ रुग्ण
दापोली – ८ रुग्ण
गुहागर – ९ रुग्ण
देवरुख ४ रुग्ण
रायपाटण १ रुग्ण

जेके फाईल, रत्नागिरी येथील ६४ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६० झाली आहे.
तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे .
रत्नागिरी – १४
खेड – ६
गुहागर – २
दापोली – १२
चिपळूण – १२
संगमेश्वर – ७
लांजा – २
राजापूर – ४
मंडणगड – १
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – १८८१
बरे झालेले – १२५२
मृत्यू – ६०
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – ५६९
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (३० जुलै २०२० पर्यंत )
जिल्ह्यात सध्या २२७ ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात २८ गावांमध्ये, दापोली मध्ये १२ गावांमध्ये, खेड मध्ये ६५ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ५ , चिपळूण तालुक्यात १०२ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात २ , गुहागर तालुक्यात १० आणि राजापूर तालुक्यात ३ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ५८ , उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २८ , कोव्हीड केअर सेंटर पेढांबे २ , उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -२० , कोव्हीड केअर सेंटर घरडा – २ , ग्रामीण रुग्णालय गुहागर – १ , कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – २२ ,असे एकूण १३३ संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या २१ हजार ९२२ इतकी आहे.
१५ हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १८ हजार १४१ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी १७हजार ६३२ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १८२६ अहवाल पॉजिटीव्ह आले असून १५ हजार ७९४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. ३१ जुलै २०२० अखेर एकूण २ लाख २९ हजार ३०० व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या १ लाख ७ हजार ९४९ आहे.

जाहिरात4