भेटीगाठी नकोच; ‘अ’वर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीनेच करा

जाहिरात-2
राजपत्रित महासंघाचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना पत्र

दापोली | प्रतिनिधी
अधिनियमाअन्वये महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन, २००५ या कायद्यानुसार, शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासंदर्भात तरतूदी विहित करण्यात आलेल्या आहेत. याप्रमाणे ‘अ’ वर्गातील अधिकाऱ्यांच्या बडल्या करतानाही समुपदेशन पद्धतीनेच केल्या जाव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाकडून सरकारडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच बदल्यांसंदर्भात भेटीगाठी संस्कृतीला आळा बसवा अशी भूमिकाही या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.

२९ जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे. अशास्वरूपाचे पत्र यापूर्वी ७ जुलै रोजीही देण्यात आले होते. या निवेदनात शासनाकडून यासंदर्भात वेळोवेळी काढण्यात आलेल्या तीन ते चार परिपत्रकांचे सदर्भही देण्यात आले आहेत. कायद्यातील नियम ४ (४) (दोन) व नियम ४(५) चे योग्यरित्या पालन होत नसल्यामुळे, झालेल्या बदल्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात आव्हान दिले जाते. मध्यावधी बदल्यांसंदर्भात उच्च न्यायालय तसेच न्यायाधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचा विचार करुन, राज्य शासनाने संदर्भाकित क्र. २ चे स्वागतार्ह परिपत्रक काढले आहे. सा.प्र.वि. च्या या परिपत्रकातील तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधिन क्र. ३ च्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश संबंधितांना वेळीच दिले जावेत, अशी विनंती आहे. बदल्यांसंदर्भातील ‘भेटीगाठी संस्कृतीला आळा बसावा, अशी महासंघाची आग्रही भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संदर्भाधिन अधिनियमातील नियम ४(२) नुसार, सक्षम प्राधिकारी, प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यात, त्यावर्षी एप्रिल व मे महिन्यात बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करील, अशी तरतूद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विद्यमान कालावधीत बदल्यांना विलंब झाला असला तरी, बदल्यांच्या अधिनियमातील तरतुदींचे पालन व्हावे, तसेच गट ‘अ अधिकाऱ्यांच्या बाबतीतही समुपदेशन पध्दतीने बदल्या व्हाव्यात, अशी अधिकारी महासंघाच्या वतीने शासनास आग्रहाची विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्र शासनाचे मुख्यसचिव संजय कुमार यांनाही देण्यात आली आहे. राजपत्रित महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे,अध्यक्ष विनोद देसाई ,नितीन काळे कोषाध्यक्ष,सरचिटणीस विनायक लहाडे यांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले आहे.

जाहिरात4